Pune Education : शिक्षणाचा उद्देश केवळ पैसा कमावणे नसून माणूस घडवणे असावा: राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, ‘फ्युएल’चा २० वा स्थापना दिन संपन्न


‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन आणि द्वितीय दीक्षांत समारंभ पुण्यात उत्साहात संपन्न झाला.

‘फ्युएल’चा २० वा स्थापना दिन संपन्न

पुणे: “शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी मिळवणे किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे एवढाच मर्यादित नसावा. शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी झाला पाहिजे.

स्वतःच्या पायावर उभे राहताना इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षणाचा खरा उद्देश माणूस घडवणे हाच असावा,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन आणि द्वितीय दीक्षांत समारंभ पुण्यात उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन
‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन

विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

या विशेष प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यवस्थापन तुकडी (२०२४-२६) आणि विविध सीएसआर (CSR) सहाय्यित अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी’ची घोषणा

याच दिमाखदार व्यासपीठावरून ‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी, पुणे’ या नूतन विद्यापीठाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

कौशल्यावर आधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी हे विद्यापीठ अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला कुलपती डॉ. सुलभा देशपांडे, फ्युएलचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. केतन देशपांडे, बजाज फिनसर्व्हचे एमडी गणेश मोहन आणि एसबीआय फाउंडेशनचे सीओओ प्रत्युष मेहरोत्रा प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील, ऑलकार्गो ग्रुपचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी आणि प्रा. मयूरी देशपांडे यांच्यासह शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील इतर मान्यवरही उपस्थित होते.

गेल्या दोन दशकांपासून ‘फ्युएल’ संस्था तरुणांना कौशल्यपूर्ण बनवून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत आहे.

संस्थेच्या या २० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करत, आगामी काळात नवीन स्किलटेक युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडतील, अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!