Pune News: खेड शिवापूर परिसरातून मार्केट यार्ड पोलिसांची मोठी कारवाई; एका महिन्यापासून फरार असलेला आरोपी गजाआड


गंभीर गुन्ह्यातील गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे.

एक महिन्यापासून फरार आरोपीला पोलिसांनी पकडले

पुणे: मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे.

नामदेव हनुवती राऊत (वय ३६, रा. साई चौक, वडगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला खेड शिवापूर परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव राऊत याच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. पोलीस त्याचा वेगवेगळ्या भागात सातत्याने शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपली ठिकाणे बदलत होता.

दरम्यान, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी खेड शिवापूर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर आणि अत्यंत गोपनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच तपास पथकाने तत्परतेने खेड शिवापूर परिसरात धाव घेतली.

पोलिसांनी परिसरात कसून शोध घेत अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचला आणि आरोपी नामदेव राऊत याला शिताफीने ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

या पथकाने केली यशस्वी कामगिरी

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले आणि पोलीस उपनिरीक्षक राजे महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.

या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस शिपाई बालाजी शिंदे, पोलीस हवालदार महिबुब नदाफ, पोलीस हवालदार दत्तात्रय राऊत, पोलीस शिपाई दिनेश माने, पोलीस हवालदार महेश जेधे, कौस्तुभ जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलीस पुढील तपास करत आहेत.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!