Indian Unmarried People | भारतामध्ये किती लोक आहेत अविवाहित, कोणत्या राज्यात सर्वाधिक प्रमाण


भारत सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम (SRS) 2023 च्या अहवालानुसार, देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 50.5 टक्के लोक अविवाहित (नेव्हर मॅरिड) आहेत.

अविवाहित लोकांचे प्रमाण भारतामध्ये वाढतेच

 देशभरातील अविवाहित पुरुषांचे प्रमाण 55.4 टक्के तर महिलांचे 45.3 टक्के आहे.

विवाहित लोकसंख्येचे प्रमाण सुमारे 45.9 टक्के असून, विधवा, घटस्फोटित किंवा विभक्त राहणाऱ्यांचे प्रमाण फक्त 3.6 टक्के आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक नागरिक

राज्यांनुसार पाहिल्यास बिहारमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे 58.3 टक्के लोक अद्याप अविवाहित आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीर आहे, जिथे हे प्रमाण 50.5 टक्के आहे.

उत्तर प्रदेशात 55.8 टक्के, उत्तराखंड आणि दिल्लीत प्रत्येकी 54 टक्के, झारखंडमध्ये 53.3 टक्के, आसाममध्ये 52.8 टक्के तर राजस्थानात 52.2 टक्के लोकसंख्या आहे.

याउलट, तमिलनाडूमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वात कमी 41.3 टक्के आहे. केरळमध्ये 42.9 टक्के, आंध्र प्रदेशात 43.4 टक्के आणि हिमाचल प्रदेशात 44.3 टक्के असे कमी प्रमाण दिसते.

लग्नाच्या नोंदणीचा देखील अभाव

बिहार आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आणि लग्नाचे वय तुलनेने जास्त असल्याने अविवाहितांचे प्रमाण अधिक दिसते.

काही तज्ज्ञांच्या मते, बिहारसारख्या राज्यांत लग्नांची नोंदणी कमी असल्याने आकडेवारी प्रभावित होऊ शकते.

दक्षिण भारतात शिक्षण, करिअर आणि शहरीकरणामुळे लग्नाचे प्रमाण जास्त आणि अविवाहितांचे कमी आहे.

युवक गटात (15.29 वर्षे) राष्ट्रीय पातळीवर सुमारे 23 टक्के अविवाहित आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये हे प्रमाण 29.1 टक्के तर केरळमध्ये फक्त 18.6 टक्के आहे.

एकूणच, देशात अविवाहित राहण्याचे प्रमाण लक्षणीय असून, प्रादेशिक फरक स्पष्ट दिसतात.

अन्य देशांच्या तुलनेमध्ये भारतात लग्न नोंदणी आणि त्या संदर्भातील जागरूकतेचा प्रामुख्याने अभाव दिसत आहे. त्यामुळे देखील ही संख्या भारतामध्ये कमी दिसत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे आणि अभ्यासकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या संदर्भामध्ये काही ठोस पावले उचलता येतात का असा विचार करत असल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले आहे.


4
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!